१. चैत्र शुद्ध १ - गुढी पाडवा
श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास,सांगवी हे ही वरील सण मोठया भक्तिभावाने आणि तितक्याच आंनदाने साजरा करतात, या सुवर्णमयी दिवशी मंदिरामध्ये खालील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
१) प्रातःकाली पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ठिक ४: ०० वाजत,श्रीच्या मुख्य मूर्तीस अभिषेक तदनंतर श्रीची नित्य आरती.
२) सूर्योदयानंतर पारंपारीक व शास्त्रोक्त पद्धतीने गुढी उभारणे आणि त्याचे पुजन.
३) मंगल वादन, सनईवादन
४) भक्तांना गंध लावणे तसेच प्रसाद म्हणून साखर वाटणे
२. चैत्र शुद्ध ९ - श्री राम नवमी
चैत्र शुद्ध नवमी या दिवशी श्री भगवान विष्णूचा सातवा अवतार मानले गेलेले प्रभूरामचंद्र यांचा जन्म झाला. सूर्यमाध्यानी आल्यानंतर दुपारी १२:०० वाजता जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.
सदर सुदिनी मंदिरामध्ये खालील कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
१) प्रातःकाळी प्रमुख विश्व्स्तांच्या हस्ते श्रींना महाभिषेक.
२) शास्त्रपारंगत ब्रह्मवृदांन करवी विषेश यागाचे आयोजन.
३) पूर्णाहुती नंतर दुपारी १२:०० वाजता रामजन्म व श्रींची आरती .
४) सकाळी ६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत द्रोणामध्ये प्रसाद म्हणून बुंदीचे वितरण.
५) दुपारी १:०० ते ४:०० वाजेपर्यंत प्रसाद वितरण (साधारणतः १००० भाविकास)
६) ७:३०वाजता श्रींची आरती.
खालील याग(होम ) मंदिराने दार वर्षी रामनवमीला केले
१) दिनांक ०४/०२/२०१० मंगळवार – श्री गणेश याग .
२) दिनांक २३/०२/२०११ बुधवार – श्री विष्णु याग .
३)दिनांक ०१/०४/२०१२ रविवार – श्री नवचंडी याग.
४) दिनांक १९/०४/२०१३ शुक्रवार – श्री रुद्र याग.
५)दिनांक ०८/०४/२०१४ मंगळवार – श्री सूर्य याग.
६)दिनांक २८/०३/२०१५ शनिवार – श्री राम याग.
७) दिनांक १५/०४/२०१६ शुक्रवार – श्री वरूण याग.
८) दिनांक ०४/०४/२०१७ मंगळवार – श्री महालक्षमी याग.
९) दिनांक १५/०३/२०१८ गुरुवार – श्री दुर्गा याग.
१०) दिनांक १३/०४/२०१९ शनिवार – श्री शनेश्वर याग .
११) दिनांक ०२/०४/२०२० गुरुवार – धन्वतरी याग.
इ . इ याग श्री कृपेने संपन्न झालेले आहेत .
सदर कार्यक्रमास दिवसभरात साधारणतः दोन -तीन हजार भाविक प्रसादाचा लाभ घेतात .
सदर उत्सवासाठी अंदाजे ५० ते ६० हजार रु एवढा खर्च येतो .
या उत्सवासाठी सहभागी होण्यासाठी अथवा उत्सवास सहायभूत होण्यासाठी भाविक ऐच्छिक वर्गणी देऊ शकतात .
३. चैत्र शुद्ध पौर्णिमा - श्री हनुमान जयंती
चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळी श्री प्रभूरामचंद्राचे निःसीम भक्त आणि अंजनेय पुत्र हनुमान यांची जयंती साजरी केली जाते.
श्रींची षोडशोपचारी पुजा झाल्यानंतर श्री हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो यामध्ये रामभक्त हनुमानाची पुजा आणि तदनंतर प्रसाद म्हणून सुंठवड्याचे वाटप.
४. आषाढ शुद्ध ११ - देवशयनी आषाढी एकादशी
आषाढ महिण्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात.हा दिवस धार्मिक व आध्यत्मिक दृष्ट्या महत्वाचा मानण्यात येतो.
संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथेही हा सोहळा मोठया आनंदाने ,उत्साहाने व भक्तीभावाने साजरा केला जातो .
१) प्रातःकाळी पहाटे ४: ०० वाजता पांडुरंग परमात्मा आणि माता रुक्मिणीआई यांच्या मूर्तीला अभिषेक तदनंतर श्रींच्या मुख्य मूर्तीस अभिषेक आणि आरती.
२) आरतीनंतर केळी व खिचडी प्रसादाचे वाटप.
३) सायंकाळी हरिकीर्तन (५:०० ते ७:१५) आणि सायं:
४) ७:३०वाजता श्रींची आरती.
५. आषाढ पौर्णिमा - गुरु पौर्णिमा
आषाढी पौर्णिमेस गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा म्हणतात या दिवशी व्यासपूजा करण्याची प्रथा आहे. .जीवनामध्ये मर्णक्रमन करीत असताना सामाजिक अथवा आध्यत्मिक क्षेत्रात मोलाचे मार्गदर्शन करून जीवनपथ सुखकर करणाऱ्या महान व्यक्ती बद्धल अथवा गुरुपदी आरूढ असणाऱया साधू -संता विषय कृतन्यता यक्त करणारा दिवस.
गुरुपरंपरेतील श्री गजानन महाराज हे आधुनिक काळामधील महान संत,अवलिया साधू असून समस्त भाविकांचे श्रद्धा स्थान आहेत या दिवशी शेकडो भाविक आवर्जून श्रींचे दर्शनास उपस्थित राहत असून आपला कृत्यन्यता भाव यक्त करीत असतात
श्री गजानन महाराज मंदिरातही हा उत्सव मोठया भक्तीभावाने, श्रद्धेने साजरा केला जातो
१) १)प्रातःकाळी श्रींच्या मुख्य मूर्तीस प्रमुख विश्वस्तांच्या हस्ते अभिषेक (पहाटे ४:०० वाजता ) तदनंतर श्रींची आरती
२) सकाळी ठिक ६:०० वाजता गजानन विजय ग्रंथाचे अखंड पारायण – मुखोतगत पारायण कर्ते :- श्री गजानन खासनीस (चिंचवड )
३) सकाळची श्रींची आरती संपन्न झाल्यापासून भाविकांना बुंदीचा प्रसाद वितरण (सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत )
४) दुपारी १२:३० पारायणाची सांगता श्रींची आरती आणि महाप्रसाद वितरण (मसाले भात/वांगे -बटाटा – हरभरा भाजी/ बुंदी ) महाप्रसाद वितरण (१:१५ ते ३:३० वाजेपर्यंत )
५) सामाजिक उपक्रमाअंतर्गत मृत्युन्जय एजुकेशन सोसायटीचे नृसिह हायस्कुल जुनी सांगवी येथील इयत्ता ५वी ते १० वी तील गरजू आणि होतकरू विध्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप ( शालेय गणवेश,बूट ,स्कूल बॅग आणि वह्या ) साधारणतः हा १०० ते १२५ विध्यार्थीं -विध्यर्तीनीन शालेय साहित्य वितरित केले जाते. (सायं ५:०० ते ७:१५ पर्यंत )
६) ७:३०वाजता श्रींची आरती.
सदर उत्सवामध्ये अंदाजे २ ते २: ५० लाख रु खर्च होतो .
वरील उत्सवामध्ये भक्त -भाविकांना ऐच्छिक देणगी देऊन योगदान देता येईल.
६. श्रावण शुद्ध १ - श्रावण मास आरंभ
आध्यात्मिक या मासास अनन्य साधारण महत्व आहे जणू हा व्रत वैकल्याचा , उपासनेचा आणि धार्मिक पूजा -पाठांचा पर्वकाळ
परंपरेनुसार श्री गजानन महाराज मंदिर ,सांगवी येथे श्रावण मासारंभाच्या पर्वकाळात सायंकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत वेगवेगळ्या धार्मिक ग्रंथाचे तसेच पुराणांचे अभ्यासू ,ज्ञानी , तज्ञ्। जाणकार मंडळींमार्फत प्रवचन सेवा अथवा ग्रंथाच्या ओव्या सहित निरूपणाचे आयोजन केलेले असते अनेक भाविक भक्त या श्रवणसुखाचा लाभ घेतात
या महिनाभर अभिषेक ग्रंथ,वाचन निरूपण यामुळे एक प्रसन्न वातावरण निर्माण झालेल असत सायंकाळी ७:३० ला श्रींची आरती होऊन प्रसाद म्हणून शिरा वाटप केला जातो.
ग्रंथ समाप्ती सांगता दिवशी सकाळी श्रीना अभिषेक ,आरती सत्यनारायण पूजा उर्वरित ओवयांचे वाचन तदनंतर श्रींची आरती आणि दुपारी १२:३० ते ३:०० वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण साधारणतः ८०० भाविकांना (चपाती /शिरा /फोडणीचे वरण /साधा भात/लाल भोपळा भाजी ) असा प्रकारे श्रावण मासारंभ निमित्त आयोजित केलेल्या ग्रंथ वाचनाची सांगता केली जाते.
७. श्रावण कृष्ण ८ - श्री कृष्ण जन्माष्टमी
जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी कृष्ण जन्मदिवस वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्शत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्ण् जन्म झाला हा उत्सव भारतभर सर्वत्र साजरा केले जातो .मथुरा, वृन्दावन,दौरका, आणि जगनाथ पुरी या ठिकाणी मोठया प्रमाणात कृष्ण जन्म साजरा करतात.
श्री संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथेही हा उत्सव मोठया आनंदाने साजरा होतो रात्री ९:००ते १२:०० किर्तनाचे आयोजन असते तदनंतर कृष्णजन्मोत्सव हा कार्यक्रम होतो आरती नंतर सुंठवड्याचे प्रसाद म्हणून वितरण होते.
८. श्रावण कृष्ण १४ - श्रावण मास समाप्ती
सत्यनारायण महापूजा व ग्रंथ वाचन समाप्ती
९. भाद्रपद शुद्ध ५ - ऋषिपंचमी
शुद्ध ब्रह्म हे निर्गुण असते आणि त्यापासून हे जग निर्माण झालेले आहे अशा भोतिक संदेश आपल्या कुर्तीतून देणारे संत श्री गजानन महाराज शेगाव यांचा समाधी दिवस . हा पावन पुण्य दिवस श्री संत गजानन महाराज मंदिर सांगवी येथे मोठया भक्तिभावाने सम्पन्न होतो
१) पहाटे ठीक ४:०० वाजता श्रींची षोडशोपचारी पूजा व अभिषेक व श्रींची आरती
२) सकाळी ६:०० वाजता श्री गजानन ग्रंथाचे अखंड पारायण -मुखोतगत पारायणकर्ते -विद्याधर जोशी (पाषाण)
३) दुपारी १२:३० वाजता श्रींची आरती
४) दुपारी १:०० ते ४:०० वाजेपर्यंत महाप्रसाद वितरण (चपाती/बेसन/शिरा/ठेसा/कापलेला कांदा) साधारणतः ६००० ते ७००० भाविकांसाठी सकाळची श्रींची आरती झाल्यानंतर द्रोणामध्ये बुंदीचा प्रसाद दिला जातो. सकाळी ६:०० ते रात्री १०:०० पर्यंत
सदर उत्सवाचा खर्च एकंदरीत ५० ते ६० हजार रुपये येत असून भाविक भक्त आपल्या यथाशक्तीप्रमाणे योगदान देऊ शकतात योगदान हे ऐच्छिक स्वरूपाचे आहे .
१०. अश्विन शुद्ध १० - विजयादशमी
आश्र्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी हा याला दसरा या नावानेही संबोधले जाते
हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्वाचा मानला जातो
११. अश्विन कृष्ण १ - काकडा प्रारंभ
श्री संत गजानन महाराज मंदिर सांगावी पुणे २७ येथेही काकडा हा एक महिनाभर आयोजित केला जातो व खालील कार्यक्रम संपन्न होतात.
पहाटे ४:०० वाजता काकड्यास प्रारंभ (आळंदी येथील वारकरी वृंद आणि उपस्थित भक्त भाविक व विश्वस्तासमवेत) व श्रींची आरती.
आरती नंतर प्रसाद म्हणून दूध वितरण (उपस्थित भाविकांसाठी )
सायंकाळी ५:०० ते ७:१५ वारकरी वृंदा समवेत हरीपाठ ७:३० श्रींची आरती व प्रसाद वितरण .
१२. कार्तिक शुद्ध ११ - कार्तिक एकादशी
किर्तन / भजन / प्रवचन
१३. कार्तिक शुद्ध १५ - काकडा समाप्ती
काकडा आरती समाप्ती दिवशी खालील कर्यक्रमाचे नियोजन असते .
पहाटे ४:०० वाजता काकडा व श्रींची आरती सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तन तदनंतर दुपारी १२:३० ते ३:०० पर्यंत.
महाप्रसाद वितरण (साधारणतः ७०० भक्तांचा ) ( भात/आमटी /वांगे -बटाटा भाजी /शिरा ) .
१४. कार्तिक कृष्ण ११ - आळंदी एकादशी
किर्तन / भजन / प्रवचन
१५. कार्तिक कृष्ण १३ - श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळा
किर्तन / भजन / प्रवचन
१६. मार्गशीर्ष शुद्ध १४ - दत्त जयंती
किर्तन / भजन / प्रवचन
१७. माघ वद्य ७ - श्री गजानन महाराज प्रकटदिन
प्रगटदिन सप्ताहाचा भव्य कार्यक्रम
दरवर्षी श्री गजानन महाराजांच्या प्रगटदिन सप्ताहाच्या कार्यक्रमाची सर्व भक्तगण आतुरतेने वाट बघत असतात.
न्यासाच्या (ट्रस्टच्या) या भव्य कार्यक्रमास सर्व सामन्याची ,भक्तांची प्रशंसा लाभलेली आहे.
या आकर्षक व भक्तिपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजनास प्रगटदिनाचे तीन महिने आधीपासून तयारी करावी लागते.
हरिनाम सप्ताह :
या प्रगटदिन सप्ताहास “अखंड हरिनाम सप्ताह ” असे संबोधतात या सप्ताहात किर्तन — भजनाचे कार्यक्रमास प्राधान्य दिलेले आहेत. अपवादात्मक स्थितीत (काही वर्षी ) संपूर्ण सप्ताहात रात्री किर्तनाचे ऐवजी रामायण , महाभारत ,भागवत ,या सारखे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. हे कार्यक्रम देखील बहुसंख्य श्रोत्त्यांच्या उपस्थितीत पार पडले. तथापि देहू आळंदीच्या या परिसरात राहणाऱ्या भाविक जनतेला मराठी किर्तन -भजनात विशेष सुची आढळली.
“किर्तनकार ” विशेषतः माऊलींच्या आळंदी यात्रेत (तीन महिने पूर्वीच) ठरविण्यास सुरवात होते. अनेक संस्था आणि व्यक्तिगत किर्तनकार महाराजांच्या पुढील तारखा या काळात घेत असतात या बाबत न्यास देखील लोकप्रिय महाराजांच्या संपर्कांत असतात.
सप्ताह समारंभाकरीता मंदिरासमोरील मैदानात भव्य मंडप उभारण्यात येतो. संपूर्ण सप्ताहातील कार्यक्रमाची छापीत स्वरूपात पत्रिका वितरित करण्यात येते.
सप्ताहातील ठळक कार्यक्रम :
१) हरिनामाचा गजर व अखंड वीणावादन :
संपूर्ण सप्ताहात अगदी पहाटेपासून हरिनामाचा गजर सुरु होतो.
पवित्र वीणेची भावपूर्ण पूजा करीत वीणेकऱ्यास दिले जाते आळंदीचे निमंत्रित मठ विध्यार्थी आळीपाळीने रात्रंदिवस अखंडपणे विणा धारण करीत असतात.
२) मंगल अभिषेक :
सप्ताहात रोज पहाटेस मंगल अभिषेक होत असतो यांस भाविकांची व नोंदणी केलेल्या यजमानांची उपस्थिती असते.
३) ज्ञानेश्वरी पठण :
सप्ताहातील पहिल्या दिवसापासून पुढे सहा दिवस “सामुहिक ज्ञानेश्वरी पठण ” असते यास ह भ प श्री शिवाजी महाराज शिंदे (आळंदी )
व्यसपीठावर विराजमान असतात त्यांच्या स्वरात स्वर मिळवीत शेकडो भक्त भगिनी व बंधू ज्ञानेश्वरी पठण करीत असतात.
सहाव्या दिवशी सायंकाळी (विशेष कार्यक्रमात ) सामुहिक दिप प्रजलनाने व प्रार्थना -पसायदानाने पठणाची सांगता होते.
४) भजन :
वेगवेगळ्या महिला मंडळातर्फे दुपारच्या समयास (दु१. ०० ते ५. ०० ) भजन गायनाचा कार्यक्रम होत असतो.
रोज तीन — चार महिला भजनी मंडळांना हि सेवा नोंदणी पद्धतीने दिली जाते.
५) हरिपाठ :
अखंड हरिनाम सप्ताहात (इतर प्रसंगी देखील ) रोज सायंकाळी (५-०० ते ६-३०) टाळ,मृदंग, आणि वाद्यांच्या गजरात
हरिपाठाचा कार्यक्रम होत असतो. हरिपाठ समाप्तीनंतर टाळकरी विदयार्थी भजने गात —- नाचत हरिनामात तल्लीन झाले असतात. अनेक उपस्थित महिला –पुरुष याचा आनंद घेत असतात. ह. भ. प. श्री. माधव महाराज इंगोले यांच्या आळंदी मठाचे विद्यार्थी यांत सहभागी असतात.
६) कलावंतांना संधी :
प्रत्यक्ष किर्तनाचा कार्यक्रम रात्री आठ वाजता सुरु होतो त्या दरम्यान (सायंकाळी ) इतर कलावंतांना कला
प्रदर्शनाची संधी दिली जाते. यांत बासरी वादन,सत्तार वादन ,भावगीते गायन या सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.
७) किर्तन :
वर उल्लेख केल्याप्रमाणे तारखेनुसार ठरलेल्या किर्तनकारांचे किर्तन रात्री सुरु होते टाळकऱ्याची भरपूर संख्या असते.
भक्तिमय वातावरण निर्माण झालेले असते सारा मंडप आणिमैदान,समोरील रस्ता समस्त जागेवर असंख्य भाविक आसनस्थ असतात. ती उपस्थिती बघून मान्यवर कीर्तनकारांना देखील हुरूप आलेला असतो.
८) प्रगटदिन सोहळा :
प्रत्यक्ष प्रगटदिनाचे दिवशी कार्यक्रमात बदल असतो. सकाळी विशेष अभिषेक असतो सोबतच श्री सत्य नारायण कथा असते.
सकाळी सहा ते दुपारी १२ ३० पर्यंत महाराजांचे दासगणु लिखित चरित्र ग्रंथाचे पारायण असते समस्त पारायण मुखाग्र असलेल्या व्यक्तीचे व्यासपीठावर विराजमान असतात. शेकडो महिला व पुरुष या सामूहिक पारायणात वाचन करीत असतात.
पारायण समाप्ती नंतर महा आरती होते व्यासपिठाधिकाऱ्या व्यक्तीचा सत्कार होतो.
या नंतर महाप्रसाद वितरण होतो शिस्त बद्ध पद्धतीत हजारो भक्तांना महाप्रसादाचा लाभ मिळतो. महाप्रसादाचा कार्यक्रम दुपारी एक ते रात्री
दहा पर्यन्त सामान्यतः सुरु असतो. दूर दूरचे भाविक भक्त प्रगटदिनी या महाप्रसादाकरिता आणि महाराजांचे दर्शनाकरिता येथे येत असतात.
महाप्रसाद चपाती,पिठलं (बेसन ) भात,भाजी,बुंदी,ठेचा,वगैरे असतो.
साधारण २१ क्विंटल गव्हाच्या पिठाच्या चपात्या तयार होतात.
यात साधारण १२ क्विंटल पिठाच्या चपात्यांचा क्रॉंट्रॅक्ट दिला जातो. उर्वरित पिठाच्या चपात्या करिता सेवाभावी महिला भगिनींची सेवा असते. पाचशेहून अधीक महिलांनी सेवा नोंदणी केलेली असते. गटागटाने प्रत्येक महिलेस दोन दोन तास सेवा दिलेली असतेप्रसंगी महाराजांचे तरुण स्वयंसेवक गण स्वतः (संपूर्ण) महाप्रसाद तयार करतात.
या सप्ताहा व्यतिरिक्त कार्यक्रमाचे अनेक वर्षा पासून त्याची हि सेवा सुरु आहे.
रात्री नियोजित कीर्तनाचा कार्यक्रम असतो.
९) काल्याचे किर्तन व महाप्रसाद :
दुसरे दिवशी काल्याचे किर्तन होते यानंतर यादिवशी देखील महाप्रसाद असतो. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला असतो.
काही भाविकांचा,मान्यवरांचा,म न पा अधिकाऱ्यांचा सत्कार देखील कीर्तनानंतर महाप्रसादापुर्वी केला जातो.
१०) ग्राम प्रदक्षिणा :
सायंकाळी महाराजांच्या पालखीची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात येते. यांत महामिरवणुकीत वेगवेगळे भजनी मंडळ, वाद्य वृंद,
तुळस डोक्यावर असलेल्या महिला असंख्य भक्तगण सामील असतात.
परत मंदिरात आल्यावर महाआरतीद्वारे समारंभाची सांगता होते.
या समस्त सोहळ्यास प्रचंड खर्च होतो सामान्यतः वीस लाख रुपयांहून अधिक खर्च झालेला असतो. शिवाय अन्नधान्य भोजनादी खर्च
वेगळा असतो भाविक भक्तांनी दिलेल्या देणग्यांद्वारे व धान्यरूप देणग्यांद्वारे हा खर्च सहज पार पडतो याकरिता देणग्या स्वीकारणे अद्यापही सुरु आहे.
।। — शुभंम भवन्तु — ।।
विनंती:- वरील समारंभात भात, पोळी, भाजी, सारखे शिजलेले पदार्थ मंदिरात वाटपासाठी आणू नये हि विनंती.
शिजलेले पदार्थ मंदिरात वाटपासाठी स्वीकारण्यास अथवा ठेवण्यास मनाई आहे.