माहिती
श्री गजानन महाराज
महाराष्ट्र ही संतांची जन्मभूमी, कर्मभूमी असून या संतांच्या माळेतील विदर्भातील संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज होय. श्री गजानन महाराज २३ फेब्रुवारी १८७८, माघ वद्य सप्तमी रोजी शेगाव येथे प्रगट झाले आणि ८ सप्टेंबर १९१०, ऋषिपंचमी रोजीसमाधिस्त झाले.
श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवी. पुणे - २७
शेगावीचा राणा अवतरला सांगवी गावात
पुण्यातील सुशिक्षित भाविक मंडळी, धनिक मंडळी एक शतकाहून अधिक काळापासून अवलिया संत श्री गजानन महाराज (शेगाव) यांच्या शक्ती सामर्थ्याची कल्पना होती. नागपूर निवासी श्रीमंत बुटी यांच्या सिताबर्डी येथील प्रशस्त वाड्यात बराच काळ महाराजांना आदराने वास्तव्यास ठेवण्यात आले होते. प्रचंड श्रीमंती असलेला कुबेर पुत्र बुटीचे आप्तगण, मित्र मंडळी पुणे शहरात होते. सहजच पुणे शहरात महाराजांच्या नावाचा पुण्यात प्रचार होऊ लागला होता. पुणे ते शेगाव प्रवास त्यावेळी अवघड होता. त्यामुळे पुणे परिसरातील सामान्य जनास महाराजांचे दर्शन घडणे कठीण होते. महाराजांच्या समाधी कालानंतर ही अनेक वर्षे पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांना दर्शनाचा योग घडणे कठीण होते.
धार्मिक कार्यक्रम
- सकाळ-संध्याकाळ सामुदायिक आरती, दुपारचे व रात्रीचे मूर्तीस भोजन इत्यादी नियमित कामे होत असतात. याकरिता मानधनावर पुजारी ठेवण्यात आले आहेत. अनेक भक्त सतत स्वयंसेवकांचे कार्य करीत असतात.
- महाराजांच्या प्रकट दिना पूर्वी सात दिवस भरपूर कार्यक्रम असतात. हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पठण, जागर, सामुदायिक ग्रंथ पारायण, भजन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम असतात.
- प्रकटदिनी व दुसऱ्या दिवशी काल्याचे कार्यक्रमानंतर हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. ऋषिपंचमी इत्यादी धार्मिक दिनीदेखील महाप्रसाद वितरित होतो.
- दर गुरुवारी महाआरती व नंतर महाप्रसाद असतो.
- दर एकादशीला सायंकाळी प्रवचन असते.
- होमहवन, काकड आरती, कृष्ण जन्म, राम जन्म, मारुती जन्म इत्यादी कार्यक्रम देखील ठरलेले असतात.
सामाजिक कार्य व समाज सेवेचे उपक्रम
- दरवर्षी शाळा सुरू होताना शेकडो गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय ड्रेस, बूट (शूज), पुस्तका करिता उत्तम बॅग, वह्या आदि साहित्य एका खास कार्यक्रमाचे आयोजन करीत वाटप केले जाते. सांगवी स्थित जून शाळा नृसिंह हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
- वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतले जातात. कोरोना काळात तर या शिबीरांचा उच्चांक गाठला आहे.
- काही कलाकारांचा संगीत कलेच्या प्रोत्साहनार्थ कार्यक्रम घेतले जातात.
- योगासन शिबीर , विद्यार्थी प्रबोधनार्थ शिबीर, आहार आरोग्यविषयक परिसंवाद इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम सतत होत असतात.
- वरील अनेक समाजोपयोगी कार्य होत असताना या कोरोना-१९ च्या कालावधीत काही सेवा न्यास द्वारे होत आहेत.
रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा
कोरोना वैश्विक महामारीमध्ये सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तिच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयात ने आण करणे सुलभ होणार आहे आणि ते ही अत्यल्प दरात. पैसे कमविणे हा न्यासाच्या उद्देश नसून सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
तेव्हा श्री गजानन महाराज सर्व सेवा ज्ञास तमाम नागरिकांना आवाहन करीत आहे की ज्यांना ज्यांना ऍम्ब्युलन्सची आवश्यकता असेल त्यांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा ही विनंती. आपला स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा.
ॲम्बुलन्स ड्रायव्हर – ७८२४९१९१९१
ॲम्बुलन्स व्यवस्थापक – ७८२५९१९१९१
श्री ओंकार आंबुलकर (विश्वस्त)
सहभागी व्हा
न्यास द्वारे अनेक समाजोपयोगी कार्ये आणि सेवा होत असतात. या कामांमध्ये तुम्ही सुद्धा आम्हाला हातभार लावून तुमची सेवा करू शकता. विविध कार्यांच्या अनुषंगाने होणाऱ्या खर्चाकरिता देणगीदारांना भक्तांना आवाहन करण्यात येत आहे.
खालील बटन दाबून तुम्ही तुमची देणगी आमच्याकडे पाठवू शकता.