सामाजिक कार्य व समाज सेवेचे उपक्रम
या मंदिरात भाव भक्तिपूर्वक महाराजांचे दर्शन घेणाऱ्या अनेक भक्तांचे मनोरथ महाराज फलद्रूप करतात असा अनेकांना अनुभव आलेला आहे. अनेक भक्तांचा महाराजांचे प्रती ओढा वाढलेला आहे. त्यामुळे अनेक भक्त आपल्या शक्तीनुसार न्यासाला सतत देणग्या देत असतात. या देणग्या द्वारे मिळणाऱ्या लाखोच्या निधीचा उपयोग ही ट्रस्ट (न्यास) पुरेपूर, जास्तीत जास्त समाजसेवेचे उपक्रम राबविण्यास करीत असते. भक्तप्रतिपालक श्री गजानन महाराज या ट्रस्ट मध्ये कार्यरत असलेल्या भक्तांना, विश्वस्तांना, अनेक तरुण स्वयंसेवकांना स्वतः प्रेरित करीत असतात. या सर्व भक्तांना लालसा असते, स्वार्थ असतो फक्त महाराजांच्या आशीर्वादाचा..! तीन तपाहून अधिक काळापासून कार्यरत असलेल्या या न्यासाला महाराजांनी कोणताही डाग लागू दिला नाही हेच या न्यासाचे खरे वैभव आहे.
- दरवर्षी शाळा सुरू होताना शेकडो गरजू विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय ड्रेस, बूट (शूज), पुस्तका करिता उत्तम बॅग, वह्या आदि साहित्य एका खास कार्यक्रमाचे आयोजन करीत वाटप केले जाते. सांगवी स्थित जून शाळा नृसिंह हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांची निवड केली जाते.
- वेळोवेळी रक्तदान शिबिर घेतले जातात. कोरोना काळात तर या शिबीरांचा उच्चांक गाठला आहे.
- काही कलाकारांचा संगीत कलेच्या प्रोत्साहनार्थ कार्यक्रम घेतले जातात.
- योगासन शिबीर , विद्यार्थी प्रबोधनार्थ शिबीर, आहार आरोग्यविषयक परिसंवाद इत्यादी समाज उपयोगी कार्यक्रम सतत होत असतात.
- वरील अनेक समाजोपयोगी कार्य होत असताना या कोरोना-१९ च्या कालावधीत काही सेवा न्यास द्वारे होत आहेत.
Previous
Next