श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवी

धार्मिक कार्यक्रम

मंदिर म्हटले की तेथे नित्य पूजाअर्चा अभिषेक इत्यादी नियमित धार्मिक कार्यासोबतच अनेक प्रासंगिक कार्यक्रम देखील असतातच.

  • सकाळ-संध्याकाळ सामुदायिक आरती, दुपारचे व रात्रीचे मूर्तीस भोजन इत्यादी नियमित कामे होत असतात. याकरिता मानधनावर पुजारी ठेवण्यात आले आहेत. अनेक भक्त सतत स्वयंसेवकांचे कार्य करीत असतात.
  • महाराजांच्या प्रकट दिना पूर्वी सात दिवस भरपूर कार्यक्रम असतात. हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पठण, जागर, सामुदायिक ग्रंथ पारायण, भजन, कीर्तन आदी भरगच्च कार्यक्रम असतात.
  • प्रकटदिनी व दुसऱ्या दिवशी काल्याचे कार्यक्रमानंतर हजारो भक्तांना महाप्रसाद दिला जातो. ऋषिपंचमी इत्यादी धार्मिक दिनीदेखील महाप्रसाद वितरित होतो.
  • दर गुरुवारी महाआरती व नंतर महाप्रसाद असतो.
  • दर एकादशीला सायंकाळी प्रवचन असते.
  • होमहवन, काकड आरती, कृष्ण जन्म, राम जन्म, मारुती जन्म इत्यादी कार्यक्रम देखील ठरलेले असतात.