रुग्णवाहिका सेवा
श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास, सांगवी ही सामाजिक / अध्यात्मिक ट्रस्ट (न्यास) असून या ट्रस्ट ने आज पर्यंत वेळोवेळी समाजाचे भान ठेवून व निर्माण होणाऱ्या परिस्थितीला अनुसरून समाजातील व्यक्तींसाठी त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी नेहमीच नेहमीच सकारात्मक पाऊल उचलले आहे.
गरजू कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा असो, रुग्णांच्या मदतीने रक्तदान असो, असहाय्य व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या कुटुंबांसाठी मोफत घरपोच जेवणाचे टिफिन असो, गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप असो, निराधार व अनाथ, अपंग, नेत्रहीन इत्यादी असे आश्रम चालवणाऱ्या संस्थांना त्यांच्या गरजेनुसार सढळ मदत असो, आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या व्यक्तींच्या शस्त्रक्रियेसाठी मदत असो, समाजामध्ये सहिष्णुता एकता व बंधुता चे जपवणूक करण्यासाठी पालखीतील दिंड्यांना केलेली मदत असो, गावचे, समाजाचे हित जोपासणे, समाज सुसंस्कृत बनवण्यासाठी योजलेले धार्मिक कार्यक्रम असो, अथवा ज्येष्ठ बांधवांचे आरोग्य निरोगी / निरामय राहण्यासाठी त्यांना मार्गदर्शन होण्यासाठी योजिलेले आरोग्य शिबिरे किंवा मार्गदर्शक मार्गदर्शक व्याख्याने असो, तसेच गरीब व गरजू नागरिकांसाठी रुग्णालयास उपचार सुलभ होण्यासाठी या रुग्णालयांना दिलेल्या बायप मिनी व्हेंटिलेटर मशीन्स असो आदी उपक्रम न्यासाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने राबवून समाजामध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रांचा विकास होण्यास मोलाचे सहकार्य केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत देशाला सहाय्यभूत होण्यासाठी पंतप्रधान सहाय्यक निधी आणि मुख्यमंत्री सहाय्यक निधि येथेही आपले योगदान दिले आहे. तसेच पूरग्रस्तांसाठी सकाळ रिलीफ फंड आला आहे भरपूर मदत केली आहे. “समाजाचे हित जोपासण्यासाठी हे ट्रस्ट सतत कार्यरत असते.”
गतवर्षी उद्भवलेल्या कोरोना वैश्विक महामारी चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी न्यासाने रुग्णाची निकड लक्षात घेता सर्वतोपरी सहाय्य केले आहे. (वैद्यकीय सुविधेपासून ते सर्व नागरिकांना लसीकरण केंद्रावरील चहा व अल्पोपहार वाटप.) या सर्व परिस्थितीचा आढावा घेतात न्यासाच्या असे दृष्टीस आले आहे की वैद्यकीय उपचारासाठी किंवा रूग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णांची फार गैरसोय होते व नाहक अधिक मूल्य ही अदा करावे लागते. जे गरजूंना परवडणारे नसते. ती अडचण दूर करण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी न्यासाने ऍम्ब्युलन्स घेतली असून तिचा लोकार्पण सोहळा आज दिनांक २३/०७/२०२१ शुक्रवार रोजी “गुरुपौर्णिमेच्या” मुहूर्तावर संपन्न होत आहे. तिच्या सहाय्याने रुग्णांना रुग्णालयात ने-आण करणे सुलभ होणार आहे आणि ते ही अत्यल्प दरात. पैसे कमविणे हा न्यासाच्या उद्देश नसून सामाजिक बांधिलकी म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तेव्हा श्री गजानन महाराज सर्व सेवा न्यास तमाम नागरिकांना आवाहन करीत आहे की ज्यांना ज्यांना ऍम्ब्युलन्सची आवश्यकता भासेल त्यांनी खालील मोबाईल नंबर वर संपर्क करावा ही विनंती. आपला स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा.
||जय गजानन||
ॲम्बुलन्स ड्रायव्हर – ७८२४९१९१९१
ॲम्बुलन्स व्यवस्थापक – ७८२५९१९१९१
श्री ओंकार आंबुलकर (विश्वस्त)